आमिष दाखवून विवाहितेची पाच लाखांची फसवणूक

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : घरातील संकटे दूर आणि पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची खोटी भीती घालून कर्नाटकातील गाणगापूर येथील भोंदूबाबाने विवाहितेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे ओळख करून मानसिक छळ करणाऱ्या या मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गंगापूर पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली.
फिर्यादी सोनाली तागड (वय २६, मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) सध्या भेंडाळा फाटा (ता. गंगापूर) येथे वास्तव्यास आहेत. मार्चमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्यांची ओळख कमलाकर जोशी (वय ५०, रा. गाणगापूर, कर्नाटक) यांच्याशी झाली. सोनाली यांनी घरगुती अडचणी सांगताच याचा गैरफायदा घेत यौटते त्यांचा विश्वास संपादन
केला. पतीने अनैतिक संबंध थांबवण्यासाठी होम हवन व ग्रहदोष निवारण करावे लागेल, अशी भीती घातली. 

या भीतीपोटी सोनाली यांनी १० मार्च ते १० टप्प्याटप्प्याने २ लाख ३५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख ७ हजार आणि उर्वरित २ लाख ५८ हजार रुपये १ जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर केले. मात्र, विधीनंतरही फरक न पडल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.


याप्रकरणी कमलाकर जोशी, त्याचा मुलगा व इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक कर्नाटकात आरोपींच्या शोधार्थ दाखल झाले आहे.